सिध्दार्थ नगरात पोस्टर युध्द विषय संरक्षक भिंतींचा पाठ पुरावा एकाचा आणि दावा दोघांचा .

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- सिध्दार्थ नगर येथे पुराचे पाणी येऊन नागरी वस्तीत येत असल्याने काहीची घरे पडली असून काहीच्या घराच्या भिंती पडून आर्थिक नुकसान होऊन पावसाळ्यात काहीचा संसार उघड्यावर पडला आहे.

याचा कायमचा बंदोबस्त साठी संरक्षक भिंती साठी या नगरातील नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे अर्ज करून तसेच पूर आल्यानंतर या ठिकाणी भेट देणारया  लोक प्रतिनिधी कडे मागणी केली असता फक्त बांधूया असे आताप्रर्यत आशाच दाखवली.दरम्यान संरक्षक भिंतींचा निधी आल्यामुळे काहीनी पोस्टर बाजी करून एक-दोन महिन्यापूर्वी संरक्षक भिंतींचे उदघाटन केले पण कामाचा अजून पत्ताच नाही.परत या ठिकाणी एक -दोन दिवसां पासून या कामाचा श्रेयवाद त्यांनी लावलेल्या पोस्टर बाजीतुन दिसून येत आहे.या कामाचे श्रेय कोणीही घ्या पण संरक्षक भिंतींचे काम पूर्ण करा अशी नागरिकांच्यातुन मागणी होत आहे.या संरक्षक भिंतींसाठी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने वैयक्तीक रित्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे अर्ज करून त्याचा पाठ पुरावा ही केला .या अर्जाची दखल घेऊन संबंधित विभागाने अर्जदाराला लेखी स्वरुपात निधी उपलब्ध झाल्या नंतर संरक्षक भिंतींचे काम करण्याची पूर्ण करत असल्याचे कळविले.पण या भिंतींचे काम सुरु होण्या अगोदरच काहीच्यात पोस्टर बाजीतुन श्रेयवाद हा चर्चेचा विषय झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post