प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापूर मध्यवर्ती एसटी स्टँडवर असलेल्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्यावर फुकटात ताव मारणारा आकाश आनंद भोसले (वय 30.रा.ताराराणी चौक.कोल्हापुर ).याच्यावर शाहुपुरी पोलिसांनी कारवाई करून अटक केली.
फेरीवाले आणि व्यावसायिकांना त्रास देत असलयाच्या घटनेत वाढ़ होऊन काही ठिकाणी वादावादी होऊन मारहाणीचे प्रकार घडल्याच्या आहेत . त्यामुळे अशा फाळकूट दादाचा बंदोबस्त करण्याची मोहिम या कारवाईने सुरु झाली.माकडवाला परिसरात राहणारा आकाश भोसले हा गेल्या काही वर्षांपासून मध्यवर्ती एसटी स्टँडवर असलेलया खाद्यपदार्थ विक्रेत्याना धमकावून त्याच्या खाद्य पदार्थवर ताव मारत होता.आणि जर कोणी विरोध केला आणि पोलिसांत तक्रार केली तर त्यांना व्यवसाय करु देणार नाही असे म्हणत धमकावत होता.
शाहुपुरी पोलिसांनी शनिवारी फेरीवाले आणि व्यावसायिकांची बैठक घेऊन अशा फाळकूट दादा विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले.त्यामुळे काही विक्रेत्यांनी आकाश भोसले या फाळकूट दादावर तक्रार दिली असता शाहुपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री आकाशला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने हात गाडीवरून वारंवार बिर्याणी आणि मासे घेतल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी आकाशला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.