दिल्ली आर डी परेडसाठी कोडोली येथील श्रीहरी मानेची निवड. ..

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

संभाजी चौगुले :

श्री.वारणा विद्यालय वारणानगर मध्ये इयत्ता ९ वी त शिकणारा ५६ महाराष्ट्र बटालीयनचा छात्रसैनिक श्रीहरी सुहास माने याची २६ जानेवारी २०२४ रोजी दिल्लीत होणाऱ्या आर डी परेड साठी कोल्हापूर कनिष्ठ विभागातून निवड झाली आहे.

मागील सप्टेंबर २०२३ पासून सुरु असलेल्या निवड प्रक्रियेत श्रीहरी ने नऊ खडतर कॅम्प मेहनतीने व चिकाटीने पूर्ण केले. कोल्हापूर सह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयातील माध्यमिक शाळांचा समावेश असलेल्या कोल्हापूर कनिष्ठ विभागातून श्रीहरीची निवड झाली आहे. या संचलन समारंभात तो राष्ट्रीय स्तरावर एन. सी. सी. सांस्कृतिक विभागाच्या डायरेक्टरेट म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे. शुक्रवार दि. २९/१२/२०२३ रोजी तो नवी दिल्लीला रवाना झाला. 

    दिल्ली आर.डी. परेडसाठी निवड झालेला शाळेचा तो पहिला विद्यार्थी आहे. त्यामुळे श्रीहरीच्या निवडी बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. त्याचे वडील श्री. सुहास माने हे मोबाईलचा व्यवसाय करतात तर आई सौ. रंजना माने या संगीत शिक्षिका आहेत.

 श्रीहरीला मुख्याध्यापक श्री. एम बी मलमे सर व एन.सी.सी. विभाग प्रमुख श्री. के एस. घुगे सर यांचे मार्गदर्शन लाभले. वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे नेते आदरणीय आमदार डॉ. विनयरावजी कोरे साहबांचे आशिर्वाद लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post