क्राईम : अल्पवयीन कॉलेज तरुणीस बदनामी करण्याची धमकी देऊन 16 तोळे दागिने लुबाडल्या प्रकरणी संशयीतासह दोघांना अटक.



प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील पाचगाव येथे एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करून तिला बदनामी करण्याची धमकी देऊन 16 तोळे दागिने लुबाडल्या प्रकरणी आदिनाथ विजय उगळे (वय 25.रा.अमृतनगर ,गिरगावरोड पाचगाव) याच्यासह तन्मय राजाराम सुतार (20 रा.नांदगाव ,करवीर)आणि सराफ दुकानदार रोहित मधुकर काळे ( वय 20 गाडगिळ कॉलनी) दोघांना करवीर पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.


अधिक माहिती अशी की,पीडीत मुलगी अल्पवयीन कॉलेज तरुणी असून तिची आणि आदिनाथ याची इन्साट्राग्रामद्वारे ओळख होऊन वारंवार गाठीभेटी होऊन प्रेमात रुपांतर झाले.याचा गैरफायदा घेत आदिनाथ याने गिरगाव परिसरातील हिल स्टॉप लॉजवर नेऊन बलात्कार करून तिला सोशल मिडीयावर बदनामी करून तुझ्या कुंटुंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या कडील 16 तोळे दागिने लुबाडल्याची घटना घडली आहे.या मुळे त्या परिसरात संतापाची लाट उसळली असून तेथील महिला संघटनानी याचा निषेध करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आदिनाथ हा कोणताही कामधंदा करीत नव्हता.पीडीत मुलगी अल्पवयीन कॉलेज तरुणी असून तिच्याशी लगट करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन वेळा बलात्कार करून या संधीचा गैरफायदा घेत माझ्यवर आर्थिक संकट असून वारंवार पैशाची मागणी करत होता.पीडीत मुलीने घरी काही न सांगता 16 तोळे दागिने त्याच्या हवाली केले.दरम्यान कालांतराने पीडीत मुलीने दिलेले दागिणे परत मागू लागली असता आदिनाथ ने नकार देत हे दागिने तुझा मित्र तन्मय सुतार याला दिल्याचे घरी सांगण्यास भाग पाडले.

आपली फसवणूक झाल्याची लक्ष्यात येताच पीडीत मुलीने आपल्या कुंटुबिया समवेत जाऊन तन्मय सुतार विरोधात करवीर पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार करवीर पोलिसांनी  तन्मय याला दोन दिवसांपूर्वी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता असता त्याला पोलिस कोठडी सुनावली.पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आदिनाथ उगळे याचा कारनामा उघडकीस आला त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून ते दागिने विक्री केलेल्या सराफ दुकानदार रोहित मधुकर काळे (24 रा .गाडगीळ कॉलनी) यांना करवीर पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना  न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशी माहिती करवीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली.पुढ़ील तपास करवीर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post