प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे सिंधी समाजाच्या सहा वर्षाच्या मुलीवर दोघां अल्पवयीन मुलांनी लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.याची माहिती मिळताच सिंधी समाजाने आपली दुकाने बंद ठेऊन एकत्र जमून गांधीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात घोषणा देत दोषीवर कारवाई करुन कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करत पोलिसांच्या विरोधात घोषणा देऊ लागले
पोलिस प्रशासन हाय -हाय आणि या पोलिस प्रशासनाचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत जमाव एकत्र जमू लागला .या वेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला.या प्रकरणी लैगिक अत्याचार केलेल्या दोघां अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.या वेळी घटना स्थळी डीवायएसपी संकेत गोसावी ,अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील हजर होते.या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता.