रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा दहा लाखाचा मुद्देमाल लंपास
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शहरात गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी भाऊसिंगजी रोडवर असलेल्या श्रीमंदर ज्वेलर्स नावाचे दुकान असून आज दुपारी तीनच्या सुमारास धाडसी दरोडा पडला असून यात रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा अंदाजे 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
आज दुपारच्या वेळी नेहमी प्रमाणे मालक आणि कामगार दुकान बंद करून जेवणाची सुट्टी करून घरी गेले .दुकान मालक परत आल्यानंतर दुकानचे कुलुप तोडल्याचे दिसून आले.त्यानी दुकानात जाऊन पहाणी केली असता तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि सहा लाखांची रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले.त्यानी या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली अ सता.पोलिसांनी घटना स्थळी येऊन पहाणी केली.पाठोपाठ स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक दाखल होऊन पहाणी करून त्यानी श्वान पथकास आणि ठसे विभागास पाचारण करण्यात आले.
चोरट्यांचा माग काढ़ण्या साठी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात येत होती.घटना स्थळी वरिष्ठ अधिकारी येऊन पहाणी केली.या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम चालू होते.