प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-प्रजासत्ताक दिना निमीत्त दारु विक्री बंद असताना चोरुन दारु विक्री प्रकरणी दारु पुरवठा करणारा संडे वाइन्सचा मालक विनोद चंदवाणी (रा.कोल्हापुर) प्रथमेश रुपेश वर्णे (30.रा.कंळबा रिंगरोड) व कपिल अशोक ओतारी (30.रा.कागदी गल्ली,शुक्रवार पेठ,को.) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून त्यांच्याकडील 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी दारु विक्री बंदी केली होती. या अनुशंगाने शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गंगावेश येथे शाहु उद्यान जवळ दोघे जण चोरुन दारु विकत असल्याचे आढळून आले असता त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानी संडे वाइन्सचे मालक विनोद चंदवाणी यांच्या कडून दारु विक्री साठी घेत असल्याचे सांगितले असता त्याना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 20 हजार कि मंतीचा मुद्देमाल जप्त करून या तिघांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.