प्रेस मीडिया लाईव्ह ;
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-करवीर तालुक्यातील दोनवडे फाटा येथे लॉज मालक चंद्रकांत पाटील याची गोळ्या घालून हत्या करून त्यांच्या मुलाच्यावरही हल्ला केला यात तो जखमी झाला आहे.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून मारेकरी दत्तात्रय पाटील (35)आणि सचिन जाधव (वय 30 रा.दोघेही खुपीरे) हे करवीर पोलिस ठाण्यात हजर झाले.
या घटनेने त्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपीनी चंद्रकांत पाटील यांच्या कडुन 5 लाख रुपये दामदुप्पट करून देतो म्हणुन घेतले होते ती घेतलेली रक्क्म परत मागितल्याने मारेकरयांनी त्याच्यावर गोळी घालून ठार मारले.पाटील यांचा या परिसरात लॉजिंग आणि हॉटेल चालवित होते.मारेकरी असलेला दत्तात्रय पाटील यांने दामदुप्पटीचे आमीष दाखवून पाच लाख रुपये घेतले होते.त्याची मुदत संपल्याने चंद्रकांत पाटील यांनी ती रक्कम वेळोवेळी परत मागितली असता चिडुन दत्तात्रय पाटील यांनी त्याच्याशी वाद झाला.
या वादातुन शनिवारी रात्रीच्या सुमारास कॉन्टरवर बसलेल्या चंद्रकांत पाटील यांना दत्तात्रय पाटील आपल्या साथीदारा समवेत येऊन शिवीगाळ आणि मारहाण करू लागले असता चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश यांने मारेकरयांच्या तावडीतून वडीलांची सुटका करण्याचा प्रयत्न केला.या झटापटीत दत्तात्रय पाटील यांनी कमरेला लावलेले रिव्हॉलवर काढ़ून गोळी झाडली असता चंद्रकांत पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडले .त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.मारेकरी दत्तात्रय पाटील आणि सचिन जाधव या दोघांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.