प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कुंरुदवाड -सुनिल चव्हाण यांच्या झालेल्या खून प्रकरणी संशयीत राहुल किरण भबिरे ,पवन कित्तुरेसह सागरयां टोळीच्या नऊ जणांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली असून पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांनी पोलिस महानिरीक्षक मा.सुनिल फुल्लारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.त्यानुसार आज मंजुरी देण्यात आली.कुंरुदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पहिल्यांदाच मोकाची कारवाई झाल्याने गुन्हेगारांची भंबेरी ऊडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच ग्रामीण भागातील असलेल्या टोळ्यासह समाजकंटकाचा नायनाट करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी दिल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी इंचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक साळवे ,अप्पर पोलिस अधीक्षक निकेश पाटील-खाटमोडे यांनी तपास करून सांगली जिल्ह्यातील सागरयां टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस महानिरीक्षक मा.सुनिल फुल्लारी यांच्याकडे पाठविला असता त्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली.