दोघे जण ताब्यात तर डॉक्टर गायब.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -क्रांतिसिंह नगर परिसरात असलेल्या एका घरात गर्भलिंग निदानाची तपासणी करून स्त्री भ्रुणहत्या करणारयां टोळीळीवर कारवाई केली.अपत्य होण्यासाठी लाखांचे औषध देणारा बनावट डॉक्टरांबरोबर त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.
स्वप्निल पाटील (रा.बालिंगा )असे त्या बनावट डॉक्टरचे नाव असून तो गायब झाला आहे.त्याचे साथीदार अजित केरबा डोंगरे (रा.म्हाडा कॉलनी)आणि कृष्णात जासूद (रा.निगवे दु.)या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या पथकासह पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने स्टींग ऑपरेशन करून उघडकीस आणले . एक बोगस गरोदर पोलिस महिलेस पाठवून हे प्रकरण उघकीस आणले याबाबतीत जबाब घेऊन रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल काम चालू होते .
या खोलीत असलेले सोनोग्राफी मशीन,आणि लागणारे किटसह 20 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक ,मनपाचे आरोग्यअधिकारी डॉ .प्रकाश पावरा ,Ad.गौरी पाटील,गीता हासूरकर यांनी हे स्टींग ऑपरेशन केले.करवीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युनूस इनामदार प्रद्न्या पाटील,योगेश कांबळे आदीनी भाग घेतला.