क्राईम न्यूज : नोकर म्हणून आला आणि चोरी करून गेला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - ताराबाई पार्क येथील हॉटेल व्यावसायिक मधुकर बापू वाघमारे (वय.65.हिम्मत बहाद्दर एनव्हेल ,ताराबाई पार्क) यांच्या घरी काम करणारा शुभम उर्फ साहिल मनोज कांबळे  ( वय.24.दत्त मंदिर रोड ,क. बावडा)यांने 15 तोळे दागीन्यासह साडे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

या घटनेचा उलगडा त्यांनी घरी बसविलेल्या सीसीटिव्ही मुळे उघकीस आला .या प्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शाहुपुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक माहिती अशी की,वाघमारे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे कुंटुबिय सोलापूर येथे रहात आहे.ते घरी एकटेच रहात असल्याने घरकासाठी चार नोकर ठेवले होते.संशयीत शुभम कांबळे हा गेल्या चार पाच वर्षापासून कामाला असून त्याच्यावर  मालकांचा विश्वास होता. वाघमारे हे सकाळी गेले की सायंकाळी घरी येत असत.याच संधीचा फायदा घेऊन ऑगस्ट ते डिसेबर 23 या काळात शुभमने मालकांच्या तिजोरीचे कुलुप काढ़ून सोन्याचे दागिने चोरी करू लागला.

या काळात त्याने तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या ,ब्रेसलेट ,चेन,मंगळसूत्र या दागीन्यासह असा 15 तोळ्याचा ऐवज लंपास केला होता. आज शाहुपुरी पोलिसांनी त्याच्या ताब्यातील चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करून त्याला अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post