प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच घेताना जिल्हा भुमिअभिलेख मधील क्लास वन ऑफिसर सुदाम जाधव आणि त्यांचा वाहन चालक उदय शेळके यांना लाचलुचपतच्या पथकाने कारवाई करून त्यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलिस करीत आहेत.