प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- उद्यमनगर येथे फुकट मिठाई दिली नाही म्हणून स्विट दुकानदार शिवकुमार बघेल यांना प्रथमेश शिंगे आणि दिलीप पाटील यांनी जबर मारहाण केली होती.या दोघांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून जखमी शिवकुमार बघेल यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.
मात्र आज त्यांचा उपचार चालू असताना मृत्यु झाला.संतापलेल्या नागरिकांनी आणि बघेल यांच्या नातेवाईकांनी मृतदेह त्यांच्या दुकाना जवळ ठेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या मुळे तेथे वहातुकीची कोंडी झाली.या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरीचे पोलिस घटना स्थळी जाऊन मृतदेह रस्त्यातुन बाजुला करुन वहातुकीस मार्ग मोकळा करून दिला .नागरिकांनी आणि बघेल यांच्या नातेवाईकांनी गुंडाना पाठीशी घालत असल्याचा आरोप पोलिसांच्यावर केला.मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळुन आपल्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नसून असा काही प्रकार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.