प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- क.बावडा परिसरात असलेल्या पाटील गल्ली चौकात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापक प्रकाश चिटणीस यांना गाडी अडवून खाली खेचून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली.हा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला होता.
आम.सतेज पाटील यांचे समर्थक माजी स्थायी समिती सभापती डॉ.संदिप नेजदार यांच्यासह आठ जणांच्या वर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.संदिप नेजदार यांनी आणि त्यांच्या समर्थक शेतकरीवर्गाने प्रकाश चिटणीस यांना उत्पादक सभासदांचा ऊस गाळपसाठी जाणून बुजून नेत नाही तसेच ऊसाच्या नोंदी करत नसल्याचा जाब विचारत जबर मारहाण केली होती.या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान मारहाणीच्या प्रकारानंतर महाडिक आणि पाटील गटाचे समर्थक पोलिस अधीक्षक कार्यालया जवळ जमा झाल्याने वातावरण तणाव पूर्ण झाले होते.दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून आम.पाटील गटाच्या 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करून त्यापैकी माजी स्थायी समिती सभापती डॉ.संदिप नेजदार यांच्यासह आठ जणांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून इतरांचा शोध घेत आहेत.