प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील केर्ली येथे विकी सर्जेराव कांबळे (वय.30 रा.केर्ली). याने गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास किचन मधील तुळईला नायलॉन दोरीने दारुच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केली.त्याची पत्नी गावी गेली होती.हा गंवडी काम करीत होता. त्याच्या आईचे निधन झाले असून तो वडीला समवेत रहात होता.तो विवाहीत असून त्याला तीन लहान मुली आहेत.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर