सदरबाजार परिसरात असलेल्या मशीद संचालक वादातुन एकावर तलवार हल्ला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- सदरबाजार परिसरात असलेल्या मशीद संचालकांच्यात झालेल्या वादातुन मोहम्मदखान तोताखान पठाण (52) यांच्यावर अनोळखी तीन ते चार व्यक्तीनी पाठलाग करून तलवार हल्ला केला.त्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या प्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.मशीदीच्या देखभाली साठी सात आठ जणांची संचालकांची समिती असते.या संचालकांत दोन गट पडल्याने याच्यात वर्चस्व निर्माण झाले.या वर्चस्वाच्या कारणातुन गेल्या काही महिन्यांपासून वाद चालू होता.आज हा वाद उफाळुन आला .मोहम्मद पठाण हे आपल्या मोपेड वरुन जात असताना तिघां हल्लेखोरांनी अचानकपणे पाठलाग करून त्यांच्यावर डोक्यात ,दंडावर आणि पाठीवर तलवारीने सपासप वार करून पळुन गेले.या हल्ल्यात पठाण गंभीर जखमी होऊन रक्तांच्या थारोळ्यात पडले .

याची माहिती पठाणच्या नातेवाईकांना समजताच त्यांना तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर आपल्या पथकासह घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा करून घटना स्थळी पडलेली मोपेड ताब्यात घेतली पोलिसांनी पठाण यांच्या नातेवाईकाकडे चौकशी केली असता हा हल्ला संचालक पदाच्या वादातुन झाली असण्याची शक्यता असल्याचे समजले. रुग्णालयात जाऊन जखमी पठाणची पोलिसांनी पहाणी करून डॉक्टरांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.दरम्यान पोलिसांनी पथके तयार करून संशयीत हल्लेखोरांच्या मागावर पाठवले.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

तलवार हल्ल्याची बातमी नागरिकांना समजताच नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली होती.शेवटी पोलिसांनी गर्दी पांगवून त्या परिसरात कायम सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेऊन मशीदी जवळही बंदोबस्त बंदोबस्त ठेवण्यात आला.या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post