प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी पायी दिंडी काढून मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यातील मराठा आरक्षणातील पक्ष, संघटना या आंदोलनास पाठिंबा देणार आहेत, तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रौ 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्याच्या संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री मा.हसन मुश्रीफसो यांच्या हस्ते ध्वजारोहण.
कोल्हापूर - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 वा.वर्धापन दिन शुक्रवार ता.26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता.छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री हसन मुश्रीफसो यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास स्थानिक लोक प्रतिनिधी,स्वातंत्र्य सैनिक,तसेच शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील यांनी कार्यक्रम सुरु होण्या अगोदर उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.तसेच या कार्यक्रमात निमंत्रिताना सहभागी होण्यासाठी 26 जानेवारी रोजी सकाळी साडे आठच्या पुढ़े आणि 10 च्या आत कोणताही शासकीय कार्यक्रम घेऊ नये.जर एखाद्या संस्थेस किंवा कार्यालयाला ध्वजारोहण करायचे असेल तर त्यानी सकाळी साडे आठच्या आत आणि 10 च्या पुढ़े करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.