क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारावे-फिरोज मुल्ला(सर)

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 कोल्हापुर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले आणि कोल्हापूर छत्रपती शाहुंच्या नगरीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारून स्मारक करण्याची मागणी करण्यात आली कोल्हापूर शहरात कुठेही सावित्रीबाई फुलेंचा पुतळा दिसला नाही मग आम्ही सावित्रीबाई फुले हाँस्पिटल मध्ये जावून तेथील फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा कोल्हापूरात नसणे हि बाब निंदनीय आहे त्वरित पुतळा उभारण्याची मागणी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात येणार आहे अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी सांगितले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, युवा नेते हुसेनभाई मूजावर, पत्रकार आमोल कुरणे,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तानाजी शिंदे, समीरभाई विजापुरे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post