प्लास्टर काढ़णे दुसऱ्या विभागाचे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - चिपळूण येथील रविंद्र भागोजी जाधव (वय.36) हे आपल्या पायाचे प्लास्टर काढ़ण्यासाठी दोन मुलासमवेत सीपीआर रुग्णालयात पाच सहा च्या दरम्यान आले होते पण तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मंगळवारी येण्यास सांगीतले तेव्हा ते हतबल झाले.
या बाबत ची अधिक माहिती अशी की,चिपळूण येथील रविंद्र भागोजी जाधव यांच्या दोन्ही पायाला प्लास्टर घातले आहे. ते 30/11/23 सीपीआर रुग्णालयात दाखल होऊन 7/12/23 अखेर उपचारासाठी दाखल होते.या दरम्यान त्यांच्या दोन्ही पायाला प्लास्टर घातले होते ते काढ़ण्यासाठी आज 06 जाने.24 यायला सांगितले होते त्या नुसार ते चिपळूण ते सातारा प्रर्यत येऊन सातारा ते कोल्हापूर प्रर्यत रेल्वेने आल्यामुळे ते वेळेत रुग्णालयात पोचू शकले नाहीत.सीपीआर येथे आल्यानंतर त्यांची 9 वर्षाची मुलगी शुभ्रा आणि 12 वर्षांचा मुलगा पार्थ यांनी रविंद्र यांना व्हीलचेअर वरुन ढ़कलत बाह्य रुग्णालयात नेले .
खरे तर हे काम तेथे उपस्थित असलेल्या वॉर्ड बॉयचे पण सर्व सामान्य नागरिकांना विचारतो कोण ? पण त्या लहान मुलानी वॉर्ड बॉयची वाट न बघता स्वतः व्हिल चेअर वरुन ढ़कलत नेले असता तेथील स्टाफ ने चौकशी केली असता आज प्लास्टर काढ़ण्यासाठी बोलावले आहे. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मंगळवारी या असे सांगताच मी एवढ़या लांबून आलोय परत कसे जाणार तेव्हा डॉक्टरांनी सांगितले आमचे काम फक्त प्लास्टर घालणे काढ़णे आमचे काम नाही.
तेव्हा त्या लहान मुलांनी व्हील चेअर ढ़कलत बाहेर आणून हिरमूसले .तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी त्यांची चौकशी केली असता घडलेली हकीकत सांगितली.पण डॉक्टरांनी त्यांनाही दाद लागू दिली नाही.शेवटी पत्रकारांनी त्यांची व्यवस्था सामाजिक पाटील महादेव पाटील (पैलवान) यांना सांगून सीपीआरच्या पाठीमागे असलेल्या आवारात केली.