प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते.
या आवाहनास प्रतिसाद देऊन इनर व्हिल क्लब ऑफ कोल्हापूर या संस्थेकडून 7 हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमी साठी दिल्या. सदरच्या शेणी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्याकडे सुर्पद केल्या. यावेळी आरोग्य निरीक्षक महेश भोसले, संस्थेचे प्रेसिडेंट मनीषा संकपाळ, सेक्रेटरी सुस्मिता मांडे, समिता चौगुले, सुवर्णा वाडीकर, समिता घोसाळकर उपस्थित होते.