प्रेस मीडिया लाईव्ह :
पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे माननीय अध्यक्ष डॉ. संघपाल उमरे सर व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ सुनील परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष महिला डॉ.सौ .श्वेता चौगुले मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मित्र समन्वय समितीची मीटिंग दिनांक 7 January 2024 रोजी इचलकरंजी शहराध्यक्ष अशोक पुरोहित सर यांच्या ऑफिसमध्ये चांगल्या रीतीने पार पडली
सभेचे प्रास्ताविक श्री अशोक पुरोहित यांनी केले.सभेच्या आयोजन संदर्भात माहिती दिली. डॉ.सौ. श्वेता सचिन चौगुले ,महिला कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीची ध्येय ,धोरणे व उद्दिष्टे याविषयी सविस्तर चर्चा केली
सभेमध्ये सर्वांशी चर्चा करून खालील बाबी विषयी आयोजन करण्याचे निश्चित केले.
1) 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
2) विविध शासकीय योजना योग्य त्या लाभार्थीपर्यंत पोहोचणे याविषयीचे धोरण निश्चित केले.
3) समाजामधील विधवा महिलांना जाणवणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे निश्चित केले.
4) दिव्यांगांच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्याविषयी प्रयत्न करणे.
5) परिसरातील बचत गटांना लघु उद्योगासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
6) विविध वृद्धाश्रमांना भेटी देऊन त्यांना जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे.
यावेळी डॉ.सौ. श्वेता सचिन चौगुले यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्यामार्फत डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल व सौ.वसवाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पोलीस मित्र समन्वय समिती यांच्या वतीने डॉ.संभाजी भोसले यांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
सभेचे आयोजन व नियोजन अशोक पुरोहित इचलकरंजी शहराध्यक्ष यांनी उत्तम प्रकारे केले होते.
यावेळी डॉ.संभाजी भोसले पश्चिम महाराष्ट्र सल्लागार, सौ .वसवाडे शोभा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,अशोक पुरोहित इचलकरंजी शहराध्यक्ष ,श्री गणेश चोळके इचलकरंजी उपाध्यक्ष, निगार मुजावर हातकणंगले तालुका अध्यक्ष, श्री रणजीत चव्हाण कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष , श्री विशाल पाटील कोल्हापूर जिल्हा सचिव आदी उपस्थित होते. श्री मधुसूदन मालपाणी हे सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन मीटिंग साठी उपस्थित राहिले . त्यासोबत कुमार कदम, वंदना कांबळे ,शुभांगी विजापुरे, पद्मजा इंगवले, ज्योती गाडेकर, पूजा कांबळे ,नम्रता गायकवाड मनीषा आवळे इत्यादी उपस्थित होते
शेवटी निगार मुजावर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.