राजाराम स्टेडियम येथील मिळकतीमधील शॉपिंग सेंटर समोरील रिकामी (पे ॲंण्ड पार्क) जागा महानगरपालिकेच्या ताब्यात

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी महानगरपालिका मालकीच्या सि.स.नं. १७०४३, १७०४३ १ते४६ राजाराम स्टेडियम येथील मिळकतीमधील शॉपिंग सेंटर समोरील रिकामी जागा पे ॲंड पार्क (वाहनतळ) साठी मे. कौन्सिल सभा ठराव नं. १७१ दि. ३/९/२००५ चे मंजुरी ने ३ वर्षे मुदतीने श्री. उत्तम विष्णू कुंभार र यांना भाडेपट्ट्याने दिलेली होती. सदर वाहनतळ वापराची ३ वर्षांची मुदत दि. २८/१०/२००८ रोजी  पूर्ण झालेली होती. सदर  ३ वर्षाची मुदत संपलेनंतर मे. कौन्सिल ठराव नं. २८९ दि. ११/१२/२००८ अन्वये पुढील मुदती करीता वाहनतळासाठी जाहिर निविदा प्रसिध्द करुन नव्याने निविदा मागविणे कामी निर्णय झालेला होता. परंतु सदर ठरावास स्थगिती देणेत आलेली होती.

      मा. जिल्हा न्यायालयात  रि.पि.अ.नं. ३६/२०१९ अन्वये सदर दाव्याचे प्रकरणी निकाल झालेला असून सदरचा दावा  दि. १६/०८/२०२३ रोजी फेटाळण्यात आला असून महानगरपालिका प्रशासनाच्या बाजूने निकाल झालेला आहे.

        या सर्व प्रक्रियमध्ये १४ वर्षाचा प्रदीर्घ कालावधी गेलेला आहे. या कालावधीमध्ये महानगर पालिकेच्या देय असणारे रक्कमा श्री. कुंभार यांनी इकडे भरणा केलेल्या नाहीत. सदरची  (६,१९.०९९/- रुपये) इतकी रक्कम महानगरपालिकेकडे व्याजासह तात्काळ भरणेत यावी  तसेच सदर  दावा फेटाळण्यात आल्यानंतर अद्यापही  श्री . कुंभार यांनी सदर जागेचा ताबा दिलेला नसल्याने   सर्व देय रक्कमा (भाडे, घरफाळा इ.) तात्काळ भरुन  सात (७) दिवसाचे आत आपले वापरातील सदर मिळकतीचा खुला कब्जा महानगरपालिकेच्या ताब्यात देणेत यावा असे नोटीसी द्वारे श्री कुंभार यांना कळविले होते.

   तथापि श्री.कुंभार यांनी मुदतीत रक्कमेचा भरणा केला नसल्याने आणि जागा ताब्यात दिला नसल्याने आज बुधवार दि.१० जानेवारी रोजी सहा. आयुक्त केतन गुजर यांच्या मार्गदर्शना खाली मिळकत विभागाच्या वतीने सदर जागा ताब्यात घेणेत आलेली आहे. तसेच नागरिकांनी या ठिकाणी लावणेत आलेली आपली वाहने तसेच हातगाडे तातडीने काढून घेणेचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.

     आजच्या या कारवाईमध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, प्रॉपर्टी पर्यवेक्षक श्रीकांत पाटील, दिपक खोत, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, यांचेसह मिळकत आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला तसेच या कार्यवाहीसाठी विधी अधिकारी खदिजा सनदी यांचे विशेष सहकार्य लाभले.


          

Post a Comment

Previous Post Next Post