प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी, ता.८ : श्री 108 कुंडीय गणपती महायज्ञाच्या आठव्या दिवशी महत्त्वपूर्ण सांस्कृतिक चुनरी महोत्सव झाला. या मंगल महोत्सवातील सहभागी महिलांच्या अमाप उत्साहाने पंचगंगा नदीकाठ बहुरंगाने सजला होता.
पंचगंगा नदीच्या पात्रातून नदीपलीकडे एक रांगेत जाणारी होडी आणि भाविकांनी हातात धरलेली हवेत लहरणारी लांबलचक अखंड साडी हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नदीतीरावर मोठी गर्दी झाली होती.भारतीय परंपरेनुसार वेषभूषा करून, नवीन लाल साडी नेसून आणि वाद्यांच्या साथीने चुनरी महोत्सव पार पडला.
चुनरी मंगल महोत्सवासाठी खास ६०० मीटर लांबीची अखंड लाल रंगाची चुनरी तयार करण्यात आली होती.सुरुवातीला विधी व विशेष पूजा करण्यात आली.विधीमध्ये गणेश पूजा, कैलास पूजा, मातृका पूजा, कृष्ण आणि पंचगंगा नदीची पूजा केली. दोन घागरी वधू-वराप्रमाणे सजवण्यात आल्या होत्या. त्याच्याभोवती विविध प्रकारचे नैवेद्य ठेवण्यात आले होते. अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने मूर्ती सजवण्यात आल्या होत्या. वैदिक मंत्रोच्चारासह नदीची पूजा करण्यात आली. पंचगंगेच्या काठावर बसून सर्व महिलांनी पवित्र नदीला दूध, दही, हळद, कुंकुचा नैवेद्य दाखवला. पूजाविधी आटोपताच सर्व महिलांकडून उत्साहात अखंड साड्याचे बंडल उलगडलायला सुरुवात केली.
नदी ओलांडण्यासाठी होडी पुढे सरकत असताना रंगीबेरंगी साड्यांची बंडल उलगडत राहिली. पंचगंगा नदी हळूहळू रंगीबेरंगी साडी पांघरत होती. भजन गाताना सर्व स्त्रिया नदीची मनोकामना पूर्ण करण्यासाठी अपार आनंदाने प्रार्थना करत होत्या.
अशाप्रकारे अखंड ६०० मीटर साड्यांची लांब चुनरी होडीतून भजन गात एका बाजूने नेले. त्यानंतर पंचगंगा मातेची महाआरती केली. घोषणांनी सर्वत्र काठ बहरून गेला. चुनरीने नदी मातेला झाकण्याचा अनमोल विधी पूर्ण होताच सर्व महिलांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. महोत्सवाचे नियोजन गायत्री महिला मंडळाने केले. त्यानंतर दुपारी महायज्ञ झाल्यानंतर सर्व भाविकभक्त भजन नंदोत्सवात दंगून गेले. भजन श्री राधा राणी महिला सत्संग मंडळाने सादर केले. सायंकाळी सनातन संस्थेच्या वतीने विशेष प्रवचन झाले.आज श्री. १०८ डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी (म्हैशाळ),पूज्य दंण्डी स्वामी अकलेश्वर महाराज (मध्यप्रदेश) यांनी भेट दिली.
श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर,भक्त मंडळ गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन करंट मारुती सत्संग माय फाउंडेशन मंडळ केसरवाणी सर्वांनी समाज युवक मंडळ भक्तगण, पदाधिकारी स्वयंसेवक सर्व व्यवस्था पाहत होते