मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नियुक्त पर्यवेक्षक आणि प्रगणक यांचे प्रशिक्षण संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे निर्देशानुसार राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षण संपूर्ण राज्यात दि.२३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे. 

या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून जवळपास ४६८ प्रगणक (राखीव १०० प्रगणक) आणि ३१ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. यामधील ३१ पर्यवेक्षक आणि ३०० प्रगणक यांचे प्रशिक्षण आज रविवार दि.२१ जानेवारी रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केले होते. तसेच उर्वरित सर्व प्रगणक  यांचे प्रशिक्षणाचे आयोजन उद्या सोमवार दि. २२ जानेवारी रोजी नाट्यगृह येथे करणेत आलेले आहे.

              राज्य मागासवर्ग आयोग आणि गोखले इन्स्टिट्यूट पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे मास्टर ट्रेनर आकाश माने यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्लाईडशोद्वारे प्रशिक्षणाचे सादरीकरण केले.

    यावेळी सहा. आयुक्त केतन गुजर, सहा.आयुक्त विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, प्र.उप अभियंता विद्युत संदीप जाधव, प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण इरफान पटेल, यांचेसह महानगरपालिकेचे अधिकारी, नियुक्त पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते.


     

Post a Comment

Previous Post Next Post