१०८ कुंडीय गणपती महायज्ञ, सकाळच्या सत्रात योगा व ध्यान शिबिर, अखंड संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी : १०८ कुंडीय गणपती महायज्ञ, सकाळच्या सत्रात योगा व ध्यान शिबिर, अखंड संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले भव्य १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याच्या सकाळी नियमितपणे गो पुजन करण्यात येते भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते. परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो. 

जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहता सर्वभूतहिते' हा त्याचा मुख्य आदर्श आहे. प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण देवांवर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो. म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे. त्यांवर प्रेम केले पाहिजे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत:करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते. पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे.गो दान करणे हे महान दान मानले जात असे. गायीची शेपटी धरून माणूस जीवनाचा सागर पार करतो, म्हणजेच गायीचे पालन करून त्याची सेवा केल्याने माणूस प्रगती करतो, 

भव्य १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याच्या पाचव्या दिवशी आयोजित कैलासचंद्र जोशी यांच्या गणपती महापुराण कथे मध्ये आज श्री गणेश जन्माच्या संगीतमय सविस्तर वर्णनकरत आपल्या मधुर वाणीतुन कथन करताना सर्वांना मंत्रमुग्ध केले व श्री जन्मोत्सव फुलांची उधळण करत लाडू वाटप सोहळा करत साजरा केला.

 नानीबाई का मायरा या संगीतमय कार्यक्रमात अक्षयजी पंडित गौड यांचे प्रवचन झाले. 

 सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन  करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन केसरवाणी ग्रुप स्वयंसेवक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post