प्रसाद कुलकर्णी यांचे इचलकरंजी न्यायालयात व्याख्यान

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२४ , हातकणंगले तालुका विधी सेवा समितीच्या वतीने इचलकरंजी  न्यायालयात ' मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या 'निमित्त समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि कोल्हापूर जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य प्रसाद माधव कुलकर्णी यांचे ' मराठी भाषा संवर्धन : गरज आणि जबाबदारी ' या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश मा. मंदार नेर्लेकर होते. 

इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.शिवराज चुडमुंगे यांनी स्वागत केले. ऍड .स्वानंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी जिल्हा न्यायाधीश ,दिवाणी न्यायाधीश ,सह दिवाणी न्यायाधीश, विशेष सरकारी वकील, ऍड .सुनील कुलकर्णी यांच्यासह इचलकरंजी वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सरकारी अभियोक्ता कार्यालय व इचलकरंजी न्यायालय आस्थापना विभागातील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post