श्री 108 कुंडीय गणपती महायज्ञात सुरू असलेला 24 तास अखंड संकीर्तनाचा गजर घुमला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी, ता.८ : श्री 108 कुंडीय गणपती महायज्ञात   सुरू असलेला  24 तास अखंड संकीर्तनाचा  गजर घुमला.वृंदावन येथील सूरदास सोळा अंध सुरदास भक्तांनी अविरतपणे हा नामस्मरणाचा जप केला.गेली आठ दिवस हरे राम, हरे कृष्णाचा अखंड जप पंचगंगा काठावर सुरु होता.या संकीर्तनातून अंध सुरदास भक्तांनी नामस्मरणापेक्षा मोठी दुसरी साधना नसून भक्तिभावाने नामस्मरण करत राहण्याचा संदेश दिला.

तीन दिवसीय आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सुरू असलेल्या ज्ञानचर्चा कार्यक्रमाचा समारोप झाला.

प्रत्येकामध्ये देव आहे. आपल्यामध्ये प्राणरूपी शिवप्पा, बुद्धी रुपामध्ये पार्वती आई, नूतन कार्यात विष्णूशक्ती, उत्साहरुपी गणेश शक्ती आणि सूर्याकडून प्रकाश व उष्णता असे पंचायतन आहे. तसेच यज्ञाचे महत्व पटवून देत त्यावर सखोल चर्चा करण्यात आली.यज्ञामध्ये निर्माण झालेली ऊर्जा लोककल्याणण व सृष्टीच्या कल्याणासाठी असते. जितके लोक यज्ञमंडपात येतात. त्यांना आशीर्वाद मिळतोच.तसेच त्यांच्यासहित त्यांचे कुटुंब व भेटणाऱ्या लोकांनाही आशीर्वाद मिळतो, असे श्री ऋषी देवव्रतजी यांनी सांगितले.सोबत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विनायक मुरदंडे उपस्थित होते.

खास राजस्थानातील कीर्तीगड येथील जेष्ठ नागरिकांच्या संगीत वाद्यांनी लक्ष वेधून घेतले. स्वागत कमान ते यज्ञशाळा मंडप परिसर मार्गावर या वाद्यांनी भजन संगीतावर भाविक भक्तांना मनमुरादपणे दंगून सोडले.

सातारा (वाई) येथील गुरुसिद्धलिंग मठाचे ज्ञानभास्कर श्री. १०८  महादेव  शिवाचार्य स्वामिनी भेट दिली.तसेच आमदार प्रकाश आवाडे, महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी भेट दिली आणि सपत्नीक महायज्ञात उपस्थिती दर्शविली. बुधवारी (ता.१०) दहा दिवसीय महायज्ञ सोहळ्याची सांगता संत संमेलन व पूर्णाआहुतीने होणार आहे. त्यानंतर भव्य महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री. पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post