उमाकांत दाभोळे यांची इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : भारतीय जनता इचलकरंजी शहर कार्यकारणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थित निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते हिंदुराव शेळके, शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने केलेल्या विकासामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचविले आहे. राज्यातही त्याच प्रमाणे गतीशिल सरकार सर्वसामन्यांसाठी काम करीत आहे. येणाऱ्या काळात सर्व निवडणूका होत असून पुन्हा एकदा देशात मोदी सरकार आणण्यासाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला सुरवात करावे असे सांगितले. भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडवून पक्ष विस्ताराचे काम करून सशक्त संघटना निर्माण करणेसाठी आपणा प्रयत्न करावे असे शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांनी सांगितले.या निवडी बरोबरच इतर आघाडी पदाधिकारी करण्यात आल्या.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू,पांडुरंग म्हातुगडे, दिपक राशीणकर, रणजीत अनुसे, मनोज साळुंखे, प्रसाद खोबरे, सौ.विजया पाटील, सौ. रमा फाटक, सौ.नीता भोसले, सौ.संगीता घोरपडे, सौ.निर्मला मोरे, सौ.योगिता दाभोळे, सौ.माधवी मुंडे, सौ.शबाना शहा, सुप्रिया मजले, चंद्रकांत चौगुले, राजेंद्र पाटील, ब्रत जोशी,बाळासाहेब पाटील, प्रविण पाटील, अमित जावळे, प्रदिप कांबळे तसेच बूथ प्रमुख,कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.यावेळी कार्यकर्माचे आभार नामदेव सातपुते यांनी मानले.