प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे दि. १२ जानेवारी २०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये दि. ३० जानेवारी २०२४ या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळुन त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार दि.३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
शहरातील सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होणेसाठी व स्तब्धतेची वेळ सर्वांना समजावी याकरिता सकाळी ठिक १०.५९ वाजता सायरन वाजविणेत येईल, त्यानंतर बरोबर ११ वाजता स्तब्धता सुरू होईल आणि सकाळी ठिक ११.०२ मिनिटांनी स्तब्धता संपल्याबाबतचा इशारा म्हणून परत सायरन वाजविणेत येईल.
महानगरपालिका अधिकारी कर्मचारी हुतात्म्यांना आदरांजली वाहणेसाठी महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहणार आहेत.
तरी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षक - विद्यार्थी तसेच सहकारी संस्था,इतर सर्व आस्थापना मधील कर्मचारी आणि शहरातील नागरिकांनी उद्या मंगळवार दि.३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आपण ज्या ठिकाणी असाल त्याठिकाणी दोन मिनिटे स्तब्ध राहुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहन महानगर पालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडुन करणेत आहे.