प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.३ समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यात आली. यावेळी सौदामिनी कुलकर्णी यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी दिलेला जीवनसंदेश आज पावणे दोनशे वर्षानंतर ही अतिशय महत्त्वाचा आहे. सावित्रीबाईंना जयंतीदिनी अभिवादन करत असताना त्यांचा सेवाभाव, त्यागवृती, धाडसीपणा ,सहनशीलता हे सद्गुण अंगिकारण्याची गरज आहे. यावेळी अन्वर पटेल, नंदा हालभावी, अश्विनी कोळी, राजेश बोम्मा,शिवाजी कदम, हनुमंत वाणी, अशोक माने,सचिन जाधव आदी उपस्थित होते.