प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनीनाशिक दौऱ्यात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पार्श्वभूमीवर देशभरात तीर्थक्षेत्र आणि मंदिरांमध्ये २२ जानेवारीपर्यंत श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते.या पार्श्वभूमीवर मंदीर स्वच्छ अभियान राबविण्यात आवाहनाला प्रतिसाद देत आज तिसऱ्या दिवशी प्रदेशउपाध्यक्ष मा.आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह, इचलकरंजी महापालिका आयुक्त मा. ओमप्रकाश दिवटे, शहराध्यक्ष पै अमृत भोसले, शिवसेना ( शिंदे गट ) शहराध्यक्ष भाऊसो आवळे यांनी स्वच्छता अभियानामध्ये भाग घेत प्रतितात्मक स्वच्छता करत गावातील संस्था कालीन सोन्या मारुती मंदिर (शिवचा मारुती), परिसरात आज स्वच्छता अभियानाला सुरूवात केली
यावेळी मा शिक्षण सभापती मनोज साळुंखे, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड जिल्हा सरचिटणीस सौ अश्विनी कुबडगे, शहर महिला अध्यक्ष सौ पुनम जाधव, नागुताई लोढे
,अरुण कुंभार, उमाकांत दाभोळे सतीश भस्मे, नामदेव सातपुते, अशोक पुरोहित, अलीहुसेन खान, महेश पाटील, संजय गेजगे, अनिस म्हालदार, राजु भाकरे , प्रदिप कांबळे, अर्जुन शिंदे, लालचंद पारिख, अवधुत पाटील,भानुदास तासगावे आदी भाजप पदाधिकारी युवा मोर्चा कार्यकर्ते नागरिक पालिका अधिकारी उपस्थित होते..