प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी, ता.४ : इचलकरंजी पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसर भक्तानी फुलला नानीबाई का मायरा ही अतूट श्रद्धेवर आधारित एक प्रेरणादायी कथा आहे. जिथे कथांच्या माध्यमातून श्रीकृष्णाची स्तुती केली जाते. नानीबाईसारखी निस्सीम भक्ती भगवंतावर असावी. जर खऱ्या मनाने भगवंताचे स्मरण केले तर तो स्वतः आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी येतो, असे आशीवर्चन १२ वर्षांचे पंडित अक्षयजी अनंतजी गौड यांनी आपल्यासमोर सुमधुर वाणीतून सांगितले.
भव्य १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याच्या चौथ्या दिवशी आयोजित नानीबाई का मायरा या संगीतमय कार्यक्रमात पंडित गौड यांचे प्रवचन झाले. कथेचे सविस्तर वर्णन करताना पंडित गौड यांनी नानीबाई यांच्या जीवनातील अनेक प्रसंग उपस्थित भक्तांसमोर मांडले. खऱ्या भक्तांवर भगवंताची असीम कृपा दर्शवत असते. अशा भक्तांचे मानवी जीवन अनमोल असल्याचे वर्णन केले आणि भक्तांना त्याचा सदुपयोग करण्यास सांगितले. तसेच कथा, देवाची आराधना करून जीवनाच्या कल्याणाविषयी पंडित गौड यांनी सांगितले. भजन संगीताच्या तालात कथा विस्ताराने सांगत त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध आणि तल्लीन करून सोडले.मायरा चे नियोजन कापड मार्केट महिला मंडळ यांनी केली.
दिवसभरात नियमित १०८ कुंडीय गणपती महायज्ञ, गणपती महापुराण कथा,सकाळच्या सत्रात योगा व ध्यान शिबिर, अखंड संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसरात विष्णूच्या अवतारातील छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीच्या वतीने सनातन हिंदू धर्माबाबत भक्तांना माहिती देण्यात येत आहे.आज जैन मुनी संस्कार शिरोमणी आचार्य १०८ कुलरत्न भूषण महाराजजी यांनी भेट दिली. इथल्या चरा चरात भगवंताचा अंश आहे. भारताची संस्कृती सर्व विश्वाला शिकवण देणारी आहे. विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आपला भारत देश असल्याचे यावेळी आचार्य भूषण महाराजजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन केसरवाणी ग्रुप स्वयंसेवक पदाधिकारी आदी उपस्थित होते.