प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी / संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजीनियरिंगच्या इलेक्ट्रिक इंजिनीरिंग विभागाची हेरले गावची कन्या ऋतुजा संजय कांबळे या विद्यार्थिनीची " स्नायडर इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई कंपनीने 3.75 लाख रुपयाचे वार्षिक पॅकेज देऊन निवड करण्यात आली.
दरवर्षी संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपनीचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. स्नायडर इलेक्ट्रॉनिक मुंबई ही एक प्रख्यात कंपनी असून भारतात तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. इलेक्ट्रिकल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी,एच आर मुलाखत या निकषावर आधारे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.
या निवडीसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख आशिष पाटील, समन्वयक, प्राध्यापक दीपक कांबळे, प्राध्यापक मयुरेश पाटील, प्राध्यापक स्वप्नाली साळुंखे, प्राध्यापक आकाश दस्ते यांचे सहकार्य लाभले. या विषयाबद्दल विद्यापीठचे अध्यक्ष संजय जी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, प्राचार्य डॉक्टर विराट गिरी, अकॅडमीक डीन. प्राध्यापक प्रशांत पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील, यांनी ऋतुजा कांबळे यांचे अभिनंदन केले.