प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी // संदीप कोले
हातकणंगले हेरले येथील नागपूर रत्नागिरी या महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी हेरले येथे सकाळी झाडी टेक मळा येथे उपस्थित राहुन राष्ट्रीय महामार्ग अधिकारी महसूल अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून शेतकऱ्यांच्यासाठी भविष्यात महामार्गावरून येण्या जाण्यासाठी होणाऱ्या अडचणीं लक्षात घेऊन दोन ठिकाणी भुयारी मार्ग, दोन्ही बाजूला सात मीटरचा सर्विस रोड, दोन नाले, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. . यावेळी हेरले लोकनियुक्त सरपंच- राहुल शेटे,माजी सभापती- राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य- अमित पाटील, अर्जुन पाटील, मनोज पाटील, विजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव गायकवाड, दादासो कोळेकर, फारुख मगदूम, शरद निंबाळकर, मुनीर जमादार ,
हेरले तलाठी एस. व्ही चांदणे,हेरले सर्कल बेळणीकर मॅडम, महमद जमादार,अशोक कदम, हरी कागले, दादासो कोळेकर, गोविंदराव आवळे, अरविंद कोळेकर, उदय वड्ड, राहुल चौगुले, गावातील शेतकरी, नागरिक,व महिला उपस्थित होत्या.