प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
26 जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होऊन पूर्ण भारताला प्रजासत्ताक दिन घोषित करण्यात आले. त्याच अनुषंगाने हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायत, गावातील संस्था सोसायटी विविध शाळा व प्रत्येक समाजाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
हेरले ग्रामपंचायत च्या वतीने भारतीय ध्वजपूजन हेरले गावचे उपसरपंच बक्तियार जमादार यांच्या हस्ते तर ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी हेरले हायस्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी सामूहिक सलामी परेड करण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत कन्या विद्या मंदिर यांनी ध्वज गीत केंद्र शाळा हेरले, शाळा नंबर दोन उर्दू शाळा यांनी सादर केले. त्यावेळी सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी भारत देशातील गीतावर नृत्य, सादर केले. त्यावेळी हेरले ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास,अधिकारी मंडल अधिकारी,तलाठी, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी हेरले गावातील विविध शाळेतील शिक्षक व शिक्षिका, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका,मदतनीस , विद्यार्थी ,विद्यार्थिनी व हेरले गावची ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.