प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी / संदीप कोले
एक जानेवारी 1818 मध्ये भीमा नदी लगत झालेल्या लढाईमध्ये 500 महारानी 28 हजार पेशव्यांचा पराभव केला. आणि ते युद्ध जिंकले. तो दिवस शौर्य दिन साजरा करण्यात येतो. त्या विजयाची स्मरण ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी भेट दिली.
त्याच अनुषंगाने कोट्यावधी भीम अनुयायी या शौर्य विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी येत असतात. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील शंभरहून अधिक बौद्ध बांधवांनी भीमा कोरेगाव स्तंभाला, व छत्रपती संभाजी महाराज समाधीस, व वडू गावचे वीर गणपत महार यांच्या समाधीस भेट देऊन अभिवादन करण्यात आले.
Tags
हातकणंगले तालुका