महत्वाची बातमी : हेरल्याच्या शेतकऱ्यांनी नागपूर ते रत्नागिरी रस्त्याचे काम केले बंद

   ग्रामपंचायतीने  चार वेळा अर्ज देऊन देखील केले अधिकाऱ्याने केले दुर्लक्ष 

प्रेस मीडिया लाईव्ह :

  प्रतिनिधी   / संदीप कोले 

 हातकणंगले तालुक्यातील  हेरले गाव मधून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एकूण बाराशे एकर शेती आहे तिथे रोज शेतकरी ये जा करत असतात पण या रत्नागिरी ते नागपूर हायवे कोणताही भुयारी मार्ग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार याचा त्रास सहन करावा लागत आहे , यासाठी अनेकदा निवेदन देऊन देखील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेली दिसून येत आहे. 

या रस्त्यालगत झाडी टेक मध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती होत असल्याने हेरले ग्रामपंचायतच्या वतीने तिकडे पाईपलाईन द्वारा पाणी पुरवले जात होते. पण ते देखील या रस्त्याच्या कामा मुळे नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे.  त्यासाठी आज सर्व गावकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला व  कामकाज बंद पडले हे समजतात अधिकारी वैभव पाटील .जाधव साहेब .श्रीधर साहेब एप्पल नायडू अधिकारी आले असतात  त्यांना धारेवर धरले .जो पर्यंत भुयारी मार्ग होत नाही तोपर्यंत येथे काम होऊ देणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी

हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे . सदस्य मनोज पाटी अमित पाटील .सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड. बालेचाद जमादार. कोळेकर सर महेश जाधव. बाबासाहेब रुईकर .आनंदा हराळे. तानाजी कोळेकर. उदय कोळेकर. देवाप्पा हराळे. भगवान कोळेकर. भुजापा कोळेकर .सचिन हक्के. रंजीत कोळेकर .काशिनाथ कोळेकर. शमु मुलांनी. जावेद मुलानी समीर पेंढारी .रशीद मुलानी .मोहसीन जमादार .राजगोंड पाटील. सतीश परमाज .हेरले गावातील महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post