प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी / संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे 3 जानेवारी रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा, कन्या शाळा, दोन नंबर शाळा हेरले. ज्ञानज्योती क्रांतीज्योती आद्य शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापका सावित्रीबाई फुले यांचे 193 वी जयंती शाळेतील शिक्षकांच्या हस्ते फोटोला हार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषा करून भाषण, कथाकथन, व त्यांच्या जीवन चरित्र सादर करण्यात आले तिन्ही शाळेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षकवृंद व विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
Tags
हातकणंगले तालुका