प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी / संदीप कोले
बिंदू चौक कोल्हापूर येथील ऐतिहासिक स्थळाचे आणि तेथील महामानवांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि या अगोदर केलेला पत्रव्यवहार लक्ष केंद्रित करणे बाबत दिनांक आठ डिसेंबर 2023 रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदन देण्यात आले होते.
त्याच निवेदनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सुशोभीकरणाबाबतीत शिष्टमंडळ बरोबर बैठक आयोजित केली होती या बैठकीत संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान कोल्हापूर यांनी शिष्ट मंडळ म्हणून अनेक मुद्दे अधिकाऱ्यांना पटवून देण्यात आले त्यात निवेदनात ऐतिहासिक बिंदू चौक येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, बिंदू चौक येथील तिन्हीही प्रवेशद्वार सांची कमान उभी करावी, बिंदू चौक येथील माहिती फलक ( उदाहरणार्थ पुतळा उभारणे, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध माणगाव परिषद महादेवराव बागल ) निळा ध्वज आणि अशोक स्तंभ संविधान उद्देशिका डॉक्टर बी आर आंबेडकर यांची सही ऍक्रेलिक बोर्डामध्ये ( आय लव बी. आर. आंबेडकर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, भाई माधवराव बागल यांच्या नावाची वाचनालय, लोकवर्गणीतून तयार असलेल्या पितळी छत्र्या महामानवाच्या पुतळ्यास बसवणे, परिसरातील पाणपोई त्वरित हटवण्यात यावी, फुटपाथ लगत बाहेरून कमान पाच फुटी रेलिंग करावे. या सर्व मागण्या अधिकाऱ्यांना दिल्या असता त्यांनी काम पूर्ण करून घेऊ असे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
व महापालिकेची प्रतिनिधी यांनी स्वतः शिष्टमंडळात सोबत घेऊन बिंदू चौक येथील स्थळाची पाहणी करून लवकरच काम पूर्ण करून घेऊ असे सांगितले. येत्या 15 जानेवारी 2000 पर्यंत कामाला प्रत्यक्षरीत्या सुरुवात न झाल्यास 26 जानेवारी 2000 रोजी प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला त्यावेळी अध्यक्ष निलेश बनसोडे उपाध्यक्ष शिवराम बुध्याळकर, सचिव पंकज आठवले आरपीआय सुखदेव बुध्याळकर, वंचित युवा शहराध्यक्ष अमित नागटिळे, वंचित युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, बीएसपी चे सुरेश आठवले, वंचित बहुजन माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष सचिन गुदगे, सचिन आडसुळ, शाहिद शेख नागेश शिंपी शिवाजी आठवले शुभम बुध्याळकर, अजय शिवशरण, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.