प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी / संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने समाजातील एकूण दहा बांधवांचा सामूहिक वाढदिवस सोहळा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हेरले माळभाग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या सोहळ्यासाठी लोकसभेचे खासदार माननीय धैर्यशील माने , विधानसभेचे आमदार माननीय राजू बाबा आवळे तसेच माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे , सावकार माद नाईक,माजी सभापती बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर थोर उद्योजक सलीम महाग, जिल्हाध्यक्ष,शिवसेना ठाकरे गट समीर चौगुले शिरोली ,माजी सभापती पंचायत समिती हातकणंगले राजेश पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय दादा चौगुले, त्याचबरोबर रोहित आवळे साहेब युवा नेते उदय वड्ड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजन बौद्ध समाजातील युवकांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव कटकोळे यांनी केले.