प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- यादवनगर परिसरात आज दुपारच्या सुमारास मुन्नाभाईला फोन केल्याच्या कारणातुन हर्षद कुंडलीक पोवार (वय 25 रा.दोनवडे) याला चौघां जणानी सत्तुरसह एडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असून या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे..
हर्षल पोवार याने दिलेल्या तक्रारी वरुन संशयीत विशाल विलास पाटील (कळे) साद शौकतअली मुजावर ,अल्ताफ देवडी (दोघे रा.जवाहरनगर ) आणि पांड्या (पुर्ण नाव समजले नाही ,लक्ष्मीपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.हर्षद पोवार हा आपला मित्र सद्दाम मुल्ला आणि अझरफ यांच्या बरोबर बाबाजी चिकन सेंटर येथे थांबले होते.या वेळी हर्षद कार मधून खाली उतरताच साद मुजावर याने तु मुन्नाभाईला फोन का केलास असें म्हणत सादने आणि त्याच्या साथीदारांनी सत्तुरसह एडक्याने मारहाण करून पळुन गेले.यात हर्षद जखमी झाल्याने त्याच्या साथीदारांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.राजारामपुरी पोलिसांना ही घटना समजताच पोलिसांनी जबाब घेऊन हल्लेखोरांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसुळ हे करीत आहेत.