गर्भलिंग निदान प्रकरणी डॉ.स्वप्निल पाटील याला पाच दिवसांची कोठडी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - गर्भलिंग निदान प्रकरणी फरार असलेला डॉ.स्वप्निल पाटील याला करवीर पोलिसांनी अटक करून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

त्याच्या साथीदारांना यापूर्वीच अटक केली असून त्या दोघांना न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील हा त्याचा साथीदार अमित डोंगरे याच्या घरात गर्भलिंग निदान करीत होता. या त्रिकुटांनी गेल्या काही वर्षापासून शेकड्याहुन जास्त महिलांचे निदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.यांनी या प्रकरणी कोणतीही नोंद ठेवलेली नाही.महिलांची तपासणी करून त्यांना लागणारी औषध कुठून खरेदी केली आणि गर्भपात केल्यावर त्या भ्रूणाचे पुढ़े काय केले याचा करवीर पोलिस शोध घेत आहेत.

यातील मुख्य आरोपीचा साथीदार  कृष्णात जासूद हा निगवे दु.येथील रहाणारा असून त्याची पत्नी येथील संरपंच असल्याने त्या गावचे कारभारी मंडळी यांनी करवीर पोलिस ठाण्यात येऊन गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post