प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- चोरीतील मोटारसायकल घेऊन फिरणारा दिगंबर संभाजी माने (वय 34 रा.गरजे मळा,आळते). याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून 1 लाख 35 हजार रुपये किंमंतीच्या चार मोटारसायकल जप्त केल्या.
शहरात दुचाकी मोटारसायकली चोरीचे प्रमाण वाढ़ले होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास वरिष्ठ अधिकारी यांनी शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.याचा तपास करीत असताना या पथकास दिगंबर माने यांच्याकडे चोरीतील मोटारसायकल असून तो कंळबा परिसरात असलेल्या तपोवन मैदानावर येणार असल्याचे समजले.तेव्हा या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा परिसरातुन दुचाकी चोरीची कबुली दिली.या दुचाकी चोरीची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत दाखल आहे.माने याने चोरीची कबुली दिली असता त्याच्या कडील 1 लाख 35 हजार किंमंतीच्या चार मोटारसायकल जप्त करून त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देऊन उर्वरीत दुचाकी मालकांचा पोलिस शोध घेत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ तसेच अंमलदार सुरेश पाटील,रामचंद्र कोळी,सागर माने,संजय पडवळ,संतोष पाटील आणि विनोद कांबळे यांनी केली.