प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -क्रांतिसिंह नाना पाटील परिसरात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान प्रकरणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती.त्यातील तपासणी करणारा डॉक्टर हा गायब झाला होता.त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
स्वप्निल केरबा पाटील (32 रा.बालिंगा) असे त्या डॉक्टरचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर करणार आहेत.त्याच्या साथीदाराना अगोदरच ताब्यात घेऊन अटक केली होती.काल त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील डॉक्टरकडे कोणताही परवाना नसताना तो त्या परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करीत होता.त्याचा साथीदार असलेला कृष्णात जासूद का एंजन्ट म्हणुन काम करीत असून त्याची पत्नी संरपच आहे .या प्रकरणी अधिक तपास करवीर पोलिस करीत आहेत.