इंचलकरंजीतील ट्रक मिस्त्रीच्या खून प्रकरणी तेलंगणा येथील तिघांना अटक.

  अनैतिक संबंधातुन खून झाल्याचे स्पष्ट.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

हातकंणगले - इंचलकंरजीतील ट्रक मिस्त्रीचा खून केल्या प्रकरणी तेलंगणा येथील 1) मिरीयाला यादगिरी महेश (26).2) गजुला सत्यनारायण शिवशंकर (27)3) मोहम्मद अमीर मंहमद शरीफखान (24).(सर्व रा.सायराबाद,तेलंगणा ).यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.

अधिक माहिती अशी की,इंचलकरंजीतील ट्रक मिस्त्री भारत पांडुरंग येसाळ (38.रेणुकानगर ,इंचलकरंजी)  याचा 07/01/24 रोजी खून केला होता.या बाबतची तक्रार मयताचे वडील पांडुरंग येसाळ यांनी हातकण्ंगले पोलिस ठाण्यात दिली होती.मयत भारत हे मुळचे तेलंगणा येथील असून ते  कुंटुबिया समवेत 

इंचलकरंजी येथील रेणुकानगरात रहात होते.ते ट्रक मिस्त्री होते.त्यांना अनोळखी इसमाने फोन करून ट्रक बंद पडल्याचे सांगून बोलावून घेऊन त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला .या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांना तपासाच्या सूचना दिल्या.

या पथकाने तीन पथके तयार करून मागावर पाठवले.या गुन्हयांचा शोध घेत असताना सीसीटिव्हीचे फुटेज आणि बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा खून मिरीयाला यादगिरी महेश याने आपल्या साथीदारा मार्फत खून केल्याचे समजले असता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तेलंगणा येथे जाऊन या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली.त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली.हा खून मयत भारत येसाळ याच्या पत्नीचे मिरीयाला महेश याच्या सोबत अनैतिक संबंध होते.याची माहिती भारत याला समजताच त्याने आपल्या पत्नीस त्रास देऊन मारहाण करु लागल्याने या तिघांनी खून केल्याची कबुली दिली.

या तिघांना अटक करून पुढ़ील तपासासाठी हातकण्ंगले पोलिसांच्या ताब्यात दिले .ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,अप्पर पोलीस अधीक्षक मा.निकेश खाटमोडे -पाटील,उपविभागीय पोलिस अधीक्षक रोहिणी साळुंखे जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणकर ,हातकंणगले पोलिस उपनिरीक्षक शेषराज मोरे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिसांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post