स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-नागाळा पार्क परिसरात असलेल्या एस्तर प्यटन शाळेजवळ आज स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जमीर मकतुम बेपारी (30.रा.विक्रमनगर)आणि रोहित सुरेश वाघमारे (36.रा.मंगेश्वर कॉलनी उचगाव)यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील दोन पिस्तुल , एक मॅक्झिन आणि 9 रांऊड असा 1लाख 2हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांच्यावर खून ,खूनाचा प्रयत्न,बलात्कारसह गंभीर स्वरुपाचे गुन्हें दाखल आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली.
Tags
क्राईम न्यूज