प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-शहरात आपण आता प्रर्यत घरफोडी चोरी ,मोबाईल चोरी ,दागिने चोरी सारख्या घटना ऐकून होतो.आता चोरट्याने बंद अवस्थेतील मोबाईल टॉवर्सच चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी ग्लोबल टेलिकॉमचे अधिकारी प्रविण तुकाराम टिकारे (रा.सुर्वेनगर ,कंळबा ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली आहे.हे टॉवर्स कोरोनाच्या काळात बंद अवस्थेत असलेलेच चोरट्यांनी चोरुन नेले.उंच टॉवर्सची चोरी कशी केली याचा पोलिस शोध घेत आहेत.या चोरीमुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले .
अधिक माहिती अशी की,या कंपनीचे 60पेक्षा जास्त टॉवर्स होते.यातील अनेक टॉवर्स बंद अवस्थेत असल्याने याची देखभाल करणारी कंपनी बंद झाल्याने या लक्ष्य देता आले नाही.याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केल्याची शक्यता आहे.हा प्रकार त्या कंपनीला समजताच त्यांच्या अधिकारी यांनी पोलिसांत जाऊन चोरीची फिर्याद दाखल केली.शहरासह आसपासच्या गावातील टॉवर्स चोरीला गेले आहेत.