मोठी बातमी : तरणखोप येथे डिझेल माफियांचा पर्दाफाश जवळपास पावणेदोन कोटींचे डिझेल जप्त



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 मुंबई-गोवा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून आज त्यातीलच एक मोठा रॅकेट उघडकीस आला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तरणखोप हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्य स्तरीय दक्षता पथकाने मोठी करवाई केली असून डिझेल माफियांचा पर्दाफाश केला असून या कारवाईत दहा डिझेलचे अनधिकृत टैंकर जप्त करून जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश प्राप्त झाले आहे.

व्याबाबत वृत्त असे की मंगळवारी, दि. २ रोजी तरणखोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी समोरील मोकळ्या जागेत टँकर क्रमांक एमएच ०४ एचएस २२०३ , एमएच ०२ एफजी ४७५३, एमएस ०४ जीएफ ८०१७, एमएच ०४ जीआर ०५९७, एमएच ३४ बीजी ८१६७, एमएच ४६ बीयु २३८८ या टँकर मधून डिझेलची अवैध्यरीत्या वाहतूक व साठवणूक होत असल्याची पक्की खबर मिळाल्या नंतर सदर खबरीची खातरजमा केल्यानंतर साठवणूक करीत असल्याने सदरचे कृत्य बेकायदेशीर असल्याचे समजताच या सर्व टँकर मधुन मिळून एकुण जवळपास पावणेदोन कोटी रुपयांची डिझेल तस्करी पकडण्यात पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाला यश प्राप्त झाले आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्यावर पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post