अजित दादा पवार गटाचे गौस पठाण शहर कार्याध्यक्ष.
प्रेस मीडिया लाईव्ह :
छ.संभाजीनगर -
आमदार सतीश चव्हाण तसेच शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित भय्या देशमुख यांच्या शिफारसी ने गौस अहमदोद्दीन पठाण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या औरंगाबाद शहर कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष मा श्री. ना. सुनील तटकरे , वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. श्री. ना. हासन मुश्रीफ, अल्पसंख्यांक चे प्रदेश अध्यक्ष मा ईद्रीस नाईकवाडी, प्रदेश कार्याध्यक्ष मा वसीम बुऱ्हाण,पक्ष निरीक्षक मा नजीबभाई मुल्ला, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी,महाराष्ट्र प्रदेश सचिव मा सय्यद मोसीन भाई औरंगाबाद शहर जिल्हा कार्याध्यक्ष शेख कय्युम अहेमद भाई, शेख अकबर भाई यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम हाउपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी पार पडला. शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल गौस अहेमदोद्दीन पठाण यांना शेख मोहसीन,शेख जुबेर,शेख मुबीन, मुजीब पटेल, यासर सरदार खान आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.