प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (प्रतिनिधी ) :-
पत्रकारितेमधील उज्वल कारकीर्द आणि सक्रिय काम करणारे सा. औरंगाबाद युवा चे संपादक अब्दुल कय्युम अब्दुल रशीद यांची व्हॉईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, दिव्या भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व यांचा आदेशानुसार व्हॉईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक वींगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी अब्दुल कय्यूम यांची मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेत ३७ हजार पत्रकार सदस्य झालेले आहेत याची नोंद गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. संघटनेचे अनेक विंग आहेत. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करावे, मुल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी, ज्या पत्रकारीतेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो ती पत्रकारिता शाबुत राहावी, सुरक्षित राहावी यासाठी अब्दुल कय्युम यांची मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे विनोद बोरे यांनी सांगितले.
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणार्या संघटनेत अब्दुल कय्युम यांची नियुक्ती झाल्यामुळे शेख लाल शेख, शेख फेरोज, डोंगरे,किशोर महाजन, परवेज खान,संजय हिंगोलिकर, डॉ. शकील शेख, रमेश जाबा, गणेश पवार, बबन सोनवने, अहमद अल हामेद, सय्यद मोईन,अलीम बेग,मोहंमद इसाकोद्दीन, एम ए शकील, शेख, इब्राहिम, शेख झाकीर, मनीष अग्रावल, सय्यद नदीम, सुरेश शिरसागर, सय्यद शब्बीर, रविंद्र शेलार, बाजीराव सोनवणे, सुजित ताजने, शेख रफीक, अकिब अहमद, बाबासाहेब धुमाळ, शेख अनीस, इस्माईल खान, शेख सिराज, ईलयास शेख, इस्माईल हुसैन, अजमद खान, नाजिमुद्दीन काझी, शेख अनिस अहेमद, सय्यद सादेक अली, सय्यद करीम, अनीस रामपुरे आदींनी अभिनंदन केले आहे.